पुना क्लब क्रिकेट मैदान व पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत निखिल पेंढारकरच्या 71 धावांच्या बळावर अॅमडॉक्स संघानेपर्सिस्टंट सिस्टीमस् संघाचा 11 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना अॅमडॉक्स संघाने 20 षटकात 9 बाद 159 धावा केल्या. भावनीश कोहलीने 46धावा करून निखिलला सुरेख साथ दिली. 159 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पर्सिस्टंट सिस्टीमस् संघाचा डाव 20 षटकात 9 बाद 148 धावांत रोखला. अॅमडॉक्स संघाकडून अवेश सय्यदने 3 तर भावनीश कोहली व मितेश मयेकर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद करून संघाला विजय मिळवून दिला. निखिल पेंढारकर सामनावीर ठरला.
दुस-या लढतीत विशाल रैनाच्या जलद नाबाद 98 धावांच्या जोरावर सिमेंस संघाने एक्ट्रीम वेबटेक संघाचा 122 धावांनी दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना सिमेंस संघाने 20 षटकात 5 बाद 201 धावा केल्या. यात हिमांशू अगरवालने दमदार अर्धशतकी खेळी करत विशालला सुरेख साथ दिली. 201 धावांच्या आव्हानाचा पाठलीग करताना हिमांशू अगरवाल, राजेश धालपे व संजय पाटील यांच्या अचूक गोलंदाजीपुढे एक्ट्रीम वेबटेक संघ केवळ 16.4 षटकात सर्वबाद 79 धावांत गारद झाला. विशाल रैना सामनावीर ठरला.
तिस-या लढतीत अतितटीच्या झालेल्या सामन्यात एल अॅड टी इन्फोटेक संघाने यार्डी संघाचा केवळ 2 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना स्नेहल खामणकरच्या नाबाद शतकी खेळीच्या बळावर एल अॅड टी इन्फोटेक संघाने 20 षटकात 5 बाद 192 धावा केल्या. 192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्वप्निल घाटगेच्या नाबाद 114 धावाची दमदार खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही व यार्डी संघने 20 षटकात 3 बाद 190 धावा केल्या. स्नेहल खामणकर सामनावीर ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
अॅमडॉक्स- 20 षटकात 9 बाद 159 धावा(निखिल पेंढारकर 71, भावनीश कोहली 46, अमरप्रीत जसपाल 4-9) वि.वि पर्सिस्टंट सिस्टीमस्- 20 षटकात 9 बाद 148 धावा(कौस्तूभ काळे 29, सुशांत बन्सल 33, सारंग साठे 21, भावनीश कोहली 2-22, मितेश मयेकर 2-25, अवेश सय्यद 3-27) सामनावीर- निखिल पेंढारकर
अॅमडॉक्स संघाने 11 धावांनी सामना जिंकला.
सिमेंस- 20 षटकात 5 बाद 201 धावा(विशाल रैना नाबाद 98(54), हिमांशू अगरवाल 53 (38), अतूल पवार 27, प्रशांतो मुखर्जी 2/38) वि.वि एक्ट्रीम वेबटेक- 16.4 षटकात सर्वबाद 79 धावा(मितेश सायनी 24, हिमांशू अगरवाल 3/18, राजेश धालपे 2-6, संजय पाटील 2-10) सामनावीर- विशाल रैना
सिमेंस संघाने 122 धावांनी सामना जिंकला.
एल अॅड टी इन्फोटेक- 20 षटकात 5 बाद 192 धावा(स्नेहल खामणकर नाबाद 101, कुंतल देब 22, अरमान पटनाईक 27, विकास भागवत 21, प्रमाद दवंडे 2-27) वि.वि यार्डी- 20 षटकात 3 बाद 190 धावा(स्वप्निल घाटगे नाबाद 114(67), गौतम तुळपुळे 33, वैभव जगताप 2-27) सामनावीर- स्नेहल खामणकर
एल अॅड टी इन्फोटेक संघाने 2 धावांनी सामना जिंकला.