पुणे-सुजाता मस्तानीच्या कोंढवा खुर्द शाखेचे उत्साहात उदघाटन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आले . कोंढवा खुर्द येथील ज्योती हॉटेल चौकासमोरील मेफेअर एल्गन्झा या इमारतीत सुजाता मस्तानीची शाखा सुरु करण्यात आली . यावेळी सुजाता मस्तानीच्या कोंढवा खुर्द शाखेचे संचालक राजेंद्र बाबर , मेघा बाबर , अण्णा थोरात , बाळासाहेब दाभेकर , नगरसेविका नंदा लोणकर , नगरसेवक प्रशांत जगताप , नगरसेवक साईनाथ बाबर , नगरसेवक प्रमोद भानगिरे , माजी नगरसेवक भरत चौधरी , विजय देशमुख ,नगरसेवक गफूर पठाण , नगरसेविका परवीन हाजी फिरोझ , माजी नगरसेवक रईस सुंडके , माजी नगरसेवक तानाजी लोणकर , संजय लोणकर आदी मान्यवर उपस्थित होते .
या शाखेमध्ये मस्तानी मँगो , पिस्ता , पायनापल , व्हॅनिला व रोज या प्रकारामध्ये उपलब्ध राहणारआहे . तसेच , आईस्क्रीममध्ये अंजीर , मँगो , पेरू , लिची , ब्लॅक ग्रेपस , पायनापल , कॉफी बाईट , चॉकलेट , चोकोबाईट आदी फ्लेवर मध्ये खवैय्यांना उपलब्ध रहाणार आहेत . ग्राहकांना घरपोच सेवा उपलब्ध राहणार आहे . अशी माहिती सुजाता मस्तानीच्या कोंढवा खुर्द शाखेचे संचालक राजेंद्र बाबर यांनी दिली .