चाटेंच्या विद्यार्थ्यांचे दहावी बोर्ड परीक्षेतही उत्तुंग यश (व्हिडिओ)
राधा येलगावकर ९९.६० तर मयंक जोशी ९८ टक्के -90 टक्केच्या पुढे २१० विद्यार्थी
पुणे- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज (ता.८) जाहीर होताच येथील चाटे शिक्षण समूहाच्या कार्यालयात आनंदोत्सव भरला. सातारा रस्त्यावरील धनकवडी येथे यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या भेटी साठी एकाच गर्दी केली . पेढेघेवून आलेल्या विद्यार्थी आणि पालकांचे यावेळी संचालक प्रा. फुलचंद चाटे यांनी स्वागत करून अभिनंदन केले. आणि मार्गदर्शन देखील केले. याशिवाय लवकरच गुणवंत यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आपण आयोजित करत असल्याचे जाहीर केले.
चाटे यांची विद्यार्थिनी राधा येलगावकर ९९ .६० टक्के गुण मिळवून चातेंच्या विद्यार्थ्यांमध्ये पहिली आली . तर मयंक जोशी याने ९८ टक्के,मानिरी सृष्टी ९७.६० टक्के,आदिती वाघ ९७.४० टक्के,पायाल पिसे ९७.20 टक्के ,अंकिता थोरात ९७ टक्के ,प्राजक्ता तांबे ९६.६० टक्के,रवी पवार ९६.४० टक्के ,वेदांती चिल्लाळ९६.20 टक्के,श्रद्धा ओंबासे ९६ टक्के, तर 90 टक्क्याहून अधिक गुण २१० विद्यार्थ्यांनी मिळविले .या उत्स्फूर्त आनंद सोहळ्याची हि पहा व्हिडिओ झलक ..