मुंबई-झी मराठी,झी युवा ,कलर्स मराठी ,स्टार प्रवाह अशा विविध मराठी वाहिन्या टीव्हीवर आपले वर्चस्व प्रस्थापित करून असताना आता मराठी टीव्हीच्या वर्तुळात सोनी या प्रख्यात वाहिनीने आपला झेंडा रोवला आहे . जो १९ ऑगस्ट पासून फडफडणार आहे. निव्वळ महिलांमधील कुरघोड्या मध्ये अडकून न रहाता ,घरातील महिला सोबत तरुणाई ,प्रौढ ,वृद्ध असा सर्व समावेश प्रेक्षक वर्ग खेचण्यासाठी या वाहिनीने नियोजन केले असून ,प्रस्थापित मराठी वाहिन्यांच्या मालिका आणि कार्यक्रमातील नेमक्या त्रुटी आणि उणीवा लक्षात घेवून ,त्यांनी जोडलेला ठराविक प्रेक्षक वर्गाची सीमारेषा ओलांडून टीव्ही पासून दूर राहिलेला प्रेक्षक देखील कसा टीव्ही पुढे आणता येईल याचा विचार करून सोनी मराठी ने आपल्या मालिकांची निर्मिती केली आहे . आतापर्यंत १०० मराठी चित्रपटांचे हक्क या नव्या वाहिनीने घेतले असून ,या वाहिनीमुळे मराठी चित्रपटांना नवे व्यासपीठ उपलब्ध होत आहे .तूर्तास प्रारंभी गुन्हे विषयक आणि राजकारण या विषयाला सोनी मराठी ने हाथ घातलेला नसला तरी आगामी काळात त्यावरही चांगली निर्मिती करण्याचा मानस असल्याचे भारतातील सोनी पिक्चर्स इंडिया चे व्यवस्थापकीय संचालक एन पी सिंग आणि सोनी मराठी या नव्या वाहिनीचे बिझनेस हेड अजय भालवणकर यांनी येथे सांगितले .
मुंबईतील जुहूतारा मधील मेरियट हॉटेल मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात या दोघांनी हि माहिती दिली .आणि आशयघन मालिकांच्या माध्यमातून ‘विणूया अतूट नाती’ ह्या आपल्या मूळ विचाराशी एकनिष्ठ राहत Sony मराठीचा मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी अतूट नाती विणण्याचा प्रयत्नअसेल.वैविध्यपूर्ण कथा आणि भक्कम विषयमांडणी असलेल्या ९ कथा मालिका (Fiction) आणि २कथाबाह्य कार्यक्रम (Non-Fiction) Sony मराठी सुरुवातीच्या काळात प्रेक्षकांना सुपूर्द करेल असे सांगून त्यांची नावे ट्रेलर सह घोषित केली
कथा मालिकांमध्ये ‘जुळता जुळता जुळतंय की’, ‘ह.म.बने तु.म.बने’, ‘सारे तुझ्याचसाठी’, ‘तीफुलराणी’, ‘दुनियादारी फिल्मी इष्टाईल’, ‘Year Down’, ‘भेटी लागी जीवा’, ‘हृदयात वाजेSomething’, ‘गर्जा महाराष्ट्र’ह्यांचा समावेश आहे.Sony मराठी सर्व मुख्य डायरेक्ट टू होम (DTH) आणि डिजिटल केबल प्लॅटफॉर्म्सवर उपलब्धअसेल.