पुणे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (बीएमसीसी) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवीग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला होता. विद्यापीठ गीताने या कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. प्रत्येक व्यवसायामध्ये वेगळा ठसा उमटविण्याची संधी असते. या संधीचा मागोवा घेऊन वेगळे काही करण्यासाठी आवश्यक असणार्या मूल्यांचा समावेश करून तुमचे वेगळेपण सिध्द करा असे आवाहन डॉ. वासुदेवन यांनी आपल्या भाषणात केले. सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य किरण शाळिग्राम अध्यक्षस्थानी होते.
प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ यांनी प्रास्ताविक भाषण केले. उपप्राचार्य डॉ. जगदीश लांजेकर, डॉ. आशीष पुराणीक, डॉ. सुरेश वाघमारे, परीक्षा विभागाचे प्रमुख डॉ. गौतम बेंगाळे, विद्यार्थी प्रतिनिधी शुभम पाटोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. भारती उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. बेंगाळे यांनी आभार मानले.