पुणे – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत पालक-शिक्षक व माता पालक संघाच्या वतीने शिवचरित्र प्रश्नमंजुषा स्पर्धेत ‘बहिर्जी’ गटाने विजेतेपद मिळविले. मुरारबाजी, तानाजी, नेताजी गटांनी अनुक‘मे दोन ते चार क‘मांक मिळविले. या स्पर्धेत इयत्ता चौथीच्या १६४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. गड-दुर्ग संवर्धन समितीचे सदस्य श्रमिक गोजममुंढे, शाला समितीचे अध्यक्ष डॉ. सुनील भंडगे, मु‘याध्यापिका कल्पना वाघ, शिक्षक-पालक संघाचे प्रसाद सुपेकर, माता-पालक संघाच्या गौरी दाते यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांमध्ये शिवचरित्राची आवड निर्माण व्हावी, शिवरायांच्या कर्तृत्वाचे पैलू माहीत व्हावेत या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे स्वरूप लेखी व तोंडी असे होते. सात गटांमध्ये विद्यार्थ्यांची विभागणी करण्यात आली होती. स्पर्धेचे हे सहावे वर्ष होते.
किल्ल्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. या स्पर्धेतून इतिहास संशोधन करण्याची विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण होईल. असा विश्वास गोजममुंढे यांनी यावेळी व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी शिवस्तुती व पोवाडा सादर केला. स्पर्धेच्या ठिकाणी भगव्या पताका, आबदागिरी लावून वातावरण निर्मिती करण्यात आली होते. संजय भंडारे व विभावरी भंडारे यांचे विशेष सहकार्य लाभले. मु‘याध्यापिका कल्पना वाघ यांनी प्रास्ताविक, मृदुला दीक्षित व अश्विनी देशपांडे यांनी सूत्रसंचालन आणि अनिता धर्माधिकारी यांनी आभार प्रदर्शन केले.