पुणे – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अहिल्यादेवी शाळेतील विद्यार्थिनींच्या बॅन्ड पथकाने आज जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या स्मारकाला त्यांच्या १८० व्या जयंतीनिमित्त मानवंदना दिली.
‘बुंदेले हरबोलो के मुँह हमने सुनी कहानी थी, खूब लडी मर्दानी वह झॉंसी वाली रानी थी’ असा जयघोष करीत झाशीच्या राणीच्या पराक‘माला उजाळा देण्यात आला. वंदे मातरम, इन्किलाब झिंदाबाद, भारत माता की जय, नही दूँगी नही दूँगी मेेरी झॉंसी नही दूँगी अशा जोशपूर्ण घोषणांच्या गजरात झाशीच्या राणीचे स्मरण करण्यात आले.
प्रखर राष्ट्रवादी विचारांसाठी झाशीच्या राणीची ओळख आहे. तिने इंग‘जांचा निकराने प्रतिकार केला. १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यातील तिचे योगदान मोलाचे होते. राणीचा पराक‘म आजही प्रेरणादायी आहे. असे विचार मु‘याध्यापिका सुलभा शिंदे यांनी व्यक्त केले. यशश्री वाघ या विद्यार्थिनीने शौर्यगीत सादर केले. मुग्धा पंढरपुरेने भा. रा. तांबे यांच्या कवितेचे वाचन केले. मु‘याध्यापिका सुलभा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपमु‘याध्यापिका दर्शना कोरके, पर्यवेक्षिका अनघा डांगे, स्मिता करंदीकर, शिक्षिका दीपाली पवार, सुषमा राऊत, विजयाश्री महाडीक, वैशाली सोनावणे यांनी संयोजन केले.