पुणे -येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या टिळक पथावरील माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पूरग‘स्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्याची मदत दिली आहे.ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली होती. त्यामध्ये विविध भागातील शाळांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आपल्या प्रमाणेच तेथील विद्यार्थी शाळांमध्ये जाऊन शिक्षण घेतात परंतु पुरामुळे त्याचं शालेय साहित्य वाहून गेल्याने शिक्षणात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी सर्व प्रकारचे साहित्य गोळा करून दिले आहे. पुणे महानगरपालिकेतील भाजपाचे नगरसेवक धीरज घाटे यांच्या सामाजिक संस्थेमार्ङ्गत हे साहित्य पूरग‘स्त भागातील विद्यार्थ्यांपर्यंत हे साहित्य पोहोचवलं जाणार आहे. आपण चांगले असलो की समाज चांगला घडतो आणि पर्यायी देश चांगला आणि सशक्त घडतो तेंव्हा गोळवलकर गुरुजींचा आदर्श आणि शिकवण समोर ठेऊन विद्यार्थ्यांनी केलेली ही मदत अत्यंत मोलाची असून पूरग‘स्त भागातील विद्यार्थ्यांना उभारी देणारे आहे. असे कौतुकोद्वार श्री घाटे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून काढले. पूरग‘स्त भागातील विद्यार्थी आपल्या सारखेच असून केवळ शैक्षणिक साहित्याअभावी त्याचे शिक्षण अपुरे राहू नये या उद्देशाने विद्यार्थ्यांनी हे साहित्य दिले असल्याचे प्राथमिक शाळेच्या मु‘याध्यापिका कल्पना धालेवाडीकर यांनी यावेळी सांगितले. चांगल्या भावनेने केलेली मदत ही कितीही छोटी किंवा मोठी असो ती गरजूंपर्यंत पोहोचतेच त्यामुळे भविष्यातही गरजूंना मदत करताना आपले विद्यार्थी कायम पुढे राहतील असा विश्वास माध्यमिक विभागाच्या मु‘याध्यापिका सौ. लिना तलाठी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
यावेळी शिक्षिका मंजुषा खेडकर, माधुरी ठकार, स्वाती राजगुरु, अंजली पवार, श्रद्धा साळवेकर, मधुरा करमकर-बापट आदी उपस्थित होते