पुणे-एन.ई.एम.एस. पूर्वप्रार्थमिक शाळेतील सीनियर केजीतील मुलांचा दीक्षांत सोहळा उत्साहात पार पडला.
पूर्वप्रार्थमिक शिक्षण पूर्ण करून मुले आता प्रार्थमिक शाळेत प्रवेश करणार आहेत.या निमित्याने शाळेच्या वतीने दीक्षांत सोहळा कार्यक्रमात मुलांना पदवी प्रदान करण्यात आली.
पूर्वप्रार्थमिक विभागाच्या ईनचार्ज सौ.शिल्पा कुलकर्णी यांनी उपस्थित पालकांचे व मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी दीक्षांत समारंभाच्या विशेष वेषभुषेत उपस्थित होते.
काही विद्यार्थ्यानी आपले मनोगत व्यक्त केले व काही विद्यार्थ्यानी नृत्य सादर केले. या कार्यक्रमासाठी उपस्थित शाळा समितीच्या अध्यक्षा डॉक्टर सविता केळकर यांनी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविले.
शाळेतील शिक्षिका स्वाती मर्चट यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रमात सर्व शिक्षिकांचा सक्रिय सहभाग होता.