मतदानावर बहिष्कार नकोच -मतदान हे कर्तव्य ,ते चुकवू नका – नाना भानगिरे
पुणे-मतदान हा हक्क आहे, भले आपण कोणावर संतापला असाल ,नाराज असाल ,नैराश्य आले असेल तरी मतदानातून आपल्याला आपल्या भावना व्यक्त करता येतात .लोकशाही टिकविण्यासाठी मतदान गरजेचे आहे असे सांगत काल शिवसेनेचे नगरसेवक नाना भानगिरे यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा विचार करू लागलेल्या लोकवस्तीत जावून त्यांची समजूत काढली आणि त्यांना नो वॉटर, नो वोट” चे बॅनर काढायला लावून मतदान करण्यास प्रवृत्त करण्याचा प्र्यत्न केला.
सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वहात आहेत. प्रचाराची रणधुमाळी सर्वदूर पसरली आहे. सर्वच राष्ट्रीय, सामाजिक, राज्यस्तरीय विषयांची चर्चा शिगेला पोहोचली आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य माणूस देखील आपला आवाज कसा ऐकू जाईल या साठी प्रयत्न करत आहेत. पुण्यातील कोथरुड, कोंढवा, हडपसर भागातील अनेक सोसायट्यांनी पिण्याच्या पाण्याच्या ज्वलंत प्रश्नाला वाचा फोडली आहे. “नो वॉटर, नो वोट” चे बॅनर या ठिकाणी झळकू लागले आहेत.
हडपसर भागातील शिवसेने चे नगरसेवक श्री प्रमोद नाना भानगिरे यांनी त्यांच्या प्रभागाच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी अनेक वेळा प्रसंगी आंदोलनाचा मार्ग स्वीकारून त्यावर तोडगा काढला आहे. डुक्कर पालन, पाणी, रस्ते, विकासाची कामे अशा अनेक प्रश्नांसाठी त्यांनी पुणे महानगरपालकेच्या आयुक्तांकडे आणि यंत्रणेकडे पाठपुरावा केला आहे.
त्यांच्या प्रभागातील ड्रीम इस्टेट सोसायटी ने देखील “नो वॉटर नो वोट” चा बॅनर लावल्याने नानांनी या सोसायटी ची सदिच्छा भेट घेतली आणि सोसायटी च्या रहिवाश्यांसोबत चर्चा केली.
रहिवाश्यांनी पाण्या सह अनेक मुद्द्यांवर नानांसमोर गाऱ्हाणे घातले. अभ्यासू वृत्ती च्या नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी सर्व प्रश्नावर सध्या काय काम चालू आहे त्या बद्दल माहिती दिली आणि सर्व प्रश्नांचा पाठपुरावा करण्याची शाश्वती दिली
.लोकशाही आपली आहे, मतदान करणे हे आपलं हक्कच तर आहेच ,पण ती जबाबदारी पण आहे.
येणाऱ्या विधानसभेच्या निवडणूकी मध्ये ,मतदान करण्यासाठी सेलिब्रिटी अनेक नागरिक, संस्था ,सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी झटापटी करत असतात,आपला हक्काचे मतदानाची अमंलबजावणी करा, असे सांगतात.
पण याचं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदान ,न करणे ,मतदानावर बहिष्कार, काही कारणामूळे ,ड्रीम्स इस्टेट मधील शेकडो नागरीकांनी बहिष्कार घातला.पण ,नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे स्वतः ,या ठिकाणी उपस्थित राहून ,नागरिकांशी संवाद साधून ,सर्व गोष्टी ची पूर्तता करून मतदान आपलं हक्क आहे .ते तुम्ही करणे गरजेचं आहे.’ हे समजून सांगून गेट वरचा बोर्ड काढण्यासाठी विनंती केली ,आणि सोसायटीच्या च्या सर्व नागरिकांनी तसेच महिला नी बोर्ड काडून; या सोसायटी मधून शंभर टक्के मतदान होणार ‘याची ग्वाही दिली.