आम्ही भाजपचे झेंडेच धरायचे काय ? शिवसैनिकांचा रोखठोक सवाल (व्हिडीओ)
पुणे- पुण्यात आठ हि आमदार भाजपचे दोन्ही खासदार भाजपचे .. आणि विद्यमान आमदारांच्या जागा त्या त्या पक्षालाच ठेवायच्या …मग आम्ही पुण्यातल्या शिवसैनिकांनी काय आयुष्यभर भाजपचेच झेंडे धरायचे काय ? असा रोख ठोक सवाल , वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील सेनेचे इच्छुक आणि महापालिकेतील माजी गटनेते नगरसेवक संजय भोसले यांनी येथे केला आणि त्यास विशेष म्हणजे सेनेचे खासदार अनिल देसाई यांनी आपल्या पद्धतीने उत्तर देखील दिले .
येरवडा कारागृहां समोरील केके भवन येथे सेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढ दिवसानिमित्त सेनेच्या संजय भोसले यांनी महिला मेळाव्याचे आयोजन केले होते . भोसले यांनी विविध कार्यक्रमाद्वारे आणि एकंदरीतच वडगाव शेरी मधून विधानसभा लढविण्याची जोरदार तयारी सुरु केली आहे . या मेळाव्यात सेनेचे नेते आणि खासदार अनिल देसाई प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते यावेळी लकी ड्रो मधील विजेत्या महिलांना गृहपयोगी वस्तूंचे वितरण करण्यात आले. महिलांसाठी यावेळी स्नेह भोजन कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता . गेल्याच आठवड्यात भोसले यांनी अशक प्रकारे दहावी आणि बारावी तील उत्तीर्ण विद्यार्ती आणि पालक मेळावा घेतला होता .त्यावेळी देखील प्रचंड गर्दी होती .या दोन्ही कार्यक्रमातून भोसले यांनी आपल्या विधानसभा उमेदवारीचे बिगुल वाजविले . मात्र नुकतेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सिटींग मेंबर च्या जागा त्या त्या पक्षाकडे ठेवून समसमान जागावाटप होईल त्यामुळे पुण्यात आठ हि जागांवर भाजपचे आमदार असल्याने येथील आठ हि जागा भाजपच्या वाटेलाच येणार असा सूचक दावा केला होता . या त्यांच्या वक्तव्याचे पडसाद या कार्यक्रमात उमटले ….पहा यावेळी नेमके कोण काय म्हणाले …