पुणे-शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघातील सर्व पदाधिकारी, गटप्रमुख व शिवसैनिकांचा भव्य निर्धार मेळावा व स्नेह भोजन आयोजित करण्यात आले होते. यावेळी नगरसेविका सौ.पल्लवी चंद्रशेखर जावळे यांच्या कार्य आहवालाचे प्रकाशन व जेष्ठ शिवसैनिकांचा सत्कार, मोठ्या प्रमाणात नवीन कार्यकर्ते यांचा पक्ष प्रवेश करण्यात आला. रविंद्र मिर्लेकर,बाळाभाई कदम अजय भोसले ,दिलीप तांबोळी ,नगरसेविका सौ पल्लवी जावळे (उप शहर संघटीका), राम भाऊ पारीख (माजी शहरप्रमुख) उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन संजय मोरे, उत्तम भुजबळ,अभय वाघमारे,चंद्रशेखर जावळे,अमोल देवळेकर,राजेश मोरे,सनी गवते,अतुल गोंदकर, अनिल दामजी,मनोज घाटे,अजय परदेशी,शंकर साठे,संतोष सोनावणे,रिजवान शेख, अमित जगताप, विरेंद्र गायकवाड, अॅड धनश्री बोराडे, त्रिगुणानाईक ताई रोहिणी कोल्हाळ, यांनी केले