पुणे-कर्वेनगर मधील वनदेवी मंदिर चौक हे अपघाताचे केंद्र झाले होते . या चौकात रोजच सकाळ संध्याकाळ होणाऱ्या वाहतूक कोंडी ने नागरिक त्रस्त झाले होते.येथे रोज वादावादीचे प्रकार आणि किरकोळ अपघात ही नित्याचीच बाब झाले होती.हे लक्षात घेता क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर आणि सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील दुधाने हे या ठिकाणी सिग्नल बसविला जावा यासाठी सातत्याने प्रयत्नशील होते.या ठिकाणी सिग्नल बसवून २ महिने झाले तरी तो कार्यान्वित होत नव्हता,अखेर संदीप खर्डेकर यांनी येथील वाहतूक पोलीस निरीक्षक वाखारे व मनपा च्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली , स्वप्नील दुधाने यांनी संबंधित कंत्राटदार नितीन पाडळे यांना त्वरित टायमिंग सेट करायला सांगितले आणि येथील सिग्नलचे काम पूर्ण झाले.भाजपचे ज्येष्ठ नेते शिवराम मेंगडे,नगरसेविका लक्ष्मीदुधाने,नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,वृषाली चौधरी यांच्या हस्ते हा सिग्नल कार्यान्वित करण्यात आला आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.यावेळी बापूसाहेब मेंगडे,प्रशांत हर्सूल,अजय बराटे,हेमंत बोरकर,जगदीश डिंगरे,कल्पनाताई पुरंदरे,इ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.