उद्यम विकास सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी संदीप खर्डेकर यांची निवड
संदीप खर्डेकर यांच्याकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा- मंत्री गिरीश बापट व आ .माधुरी मिसाळ
पुणे-८ शाखांसह १०० कोटी पेक्षा जास्त ठेवी असणारी उद्यम विकास सहकारी बँक सहकार क्षेत्रातील अग्रणी बँक असून येणाऱ्या काळात बँकेचा अधिक विस्तार करू असे मनोगत बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केले.आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संस्कारातून विविध क्षेत्रात कार्यरत आहोत आणि त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात नियमांचे पालन करताना नीतिमत्तेला आम्ही प्राधान्य देतो आणि आम्ही समाजाचे विश्वस्त आहोत याचे संपूर्ण भान आम्हाला आहे व म्हणूनच सचोटीने काम करून ग्राहकांची विश्वासार्हता संपादन करून प्रगती साधू असे ही ते म्हणाले.उद्यम विकास सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदी बँकेचे संचालक संदीप खर्डेकर यांची आज एकमताने निवड करण्यात आली ,उपनिबंधक पुणे शहर (१) प्रशांत सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत आज संचालक मंडळाच्या बैठकीत खर्डेकर यांची निवड करण्यात आली.यावेळी बँकेच्या संचालिका आमदार माधुरी मिसाळ ,संचालक व शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष महेश लडकत,बँकेच्या उपाध्यक्ष लीना अनास्कर,नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,नगरसेवक राजाभाऊ बराटे,संचालक दिलीप उंबरकर,पांडुरंग कुलकर्णी,मनोज नायर,सीताराम खाडे,निरंजन फडके,राजन परदेशी,महेंद्र काळे,शिरीष कुलकर्णी,गोकुळ शेलार इ उपस्थित होते.
पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री ना गिरीश बापट यांनी निवडणूक झाल्यावर बँकेस भेट देऊन श्री संदीप खर्डेकर यांचे अभिनंदन केले.तसेच खर्डेकर यांची संचालक मंडळाने एकमताने निवड केली आहे ही समाधानाची बाब असून एकसंघपणे व एकदिलाने काम करून बँकेची प्रगती साधावी,असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संभाजी भागाचे कार्यवाह सुधीर जवळेकर,सह कार्यवाह अभय थेटे व रवी क्षीरसागर उपस्थित होते.