पुणे-खासदार संजय काकडे यांची फरफट पाहवत नाही त्यांनी आता संभाजी ब्रिगेड ची उमेदवारी स्वीकारून पुणे लोकसभा लढवावी असे जाहीर आवाहन संभाजी ब्रिगेड चे संतोष शिंदे यांनी केले आहे .
या संदर्भात शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि ,संभाजी ब्रिगेड पुणे लोकसभा निवडणूक लढवणार आहे. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी संभाजी ब्रिगेड’चा जिल्हाध्यक्ष म्हणून मी (संतोष शिंदे) इच्छुक आहे. सामान्य लोकांच्या, प्रत्येक नागरिकांच्या न्याय हक्कासाठी आजपर्यंत आम्ही लढत आलो आहोत. आमच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी राज्यसत्ये शिवाय पर्याय नाही. म्हणून संभाजी ब्रिगेड लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे व संसदेवर संभाजी ब्रिगेडचा ‘भगवा’ फडकवल्याशिवाय शांत बसणार नाही. संभाजी ब्रिगेड साठी ही निवडणूक प्रतिष्ठेचा विषय झालेला आहे. परंतु संभाजी ब्रिगेडच्या वतीने अजून ‘अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नाही.’ आणि मी निवडणूक लढणार आहे. व भल्याभल्यांची झोप आम्ही उडवणार आहोत.
खासदार संजय काकडे यांची उमेदवारीसाठी वेगवेगळ्या पक्षांकडे रोज मागणी सुरू आहे. परंतु काकडे यांची होणारी फरपट पाहवत नाही भाजपला मा. संजय काकडे यांची किंमत नाही, आणि काँग्रेस संजय काकडे यांना स्वीकारायला तयार नाही. याचा अर्थ संजय काकडेंनी इकडे तिकडे फिरण्यापेक्षा ‘संभाजी ब्रिगेड’ मध्ये सहभागी व्हावं आणि कर्तुत्वान खा. संजय काकडेंनी ‘संभाजी ब्रिगेड’ कडून लोकसभा निवडणूक लढवावी. संजय काकडे यांच्यासाठी मी निवडणुकीतून एक पाऊल मागे घेऊन काकडे यांसाठी पुणे लोकसभेची जागा सोडायला तयार आहे. मा. संजय काकडे साहेबांना ‘संभाजी ब्रिगेड’ कडून उमेदवारी मिळण्यासाठी ‘संभाजी ब्रिगेड’ची संपूर्ण निष्ठावंत ताकत मा. काकडे साहेबांच्या पाठीशी उभी करायला तयार आहे. ‘संभाजी ब्रिगेड’ आजपर्यंत मराठा – बहुजन समाजाचे प्रबोधन करत व लाखो मराठा-बहुजन समाज चळवळीच्या रूपाने एकत्र करण्याचा प्रयत्न केला. समाजाच्या न्याय्य हक्कासाठी ब्रिगेड लढत, भांडत, जोडत आली म्हणून संभाजी ब्रिगेडची विचारधारा सर्वांना मान्य आहे. ही विचारांची ताकद व केडरबेस संघटन खा. संजय काकडे यांच्या पाठीशी उभी राहिली तर खा. संजय काकडे यांच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडची ‘भगवी पताका’ संसदेवर फडकल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासाठी आम्ही ‘रक्ताचं पाणी करुन…’ संजय काकडे यांच्या पाठीशी उभा राहिला तयार आहे. व माझी उमेदवारी ‘मी’ त्यांना द्यायला तयार आहे. खा संजय काकडे साहेबांनी संभाजी ब्रिगेड संभाजी ब्रिगेडचा विचार करून लोकसभेची तयारी करावी व आपली फरफट थांबवावी एवढीच मागणी आहे. खा काकडेंसाठी संभाजी ब्रिगेड एकजुटीने लढायला तयार आहे. त्यांनी विचार करावा.असे संतोष शिंदे यांनी म्हटले आहे .