पुणे- नाट्य आणि सिने सृष्टीतील अभिनेते रमेश भाटकर ,अशोक शिंदे आणि चेतन दळवी यांना सलाम पुणे पुरस्कार जाहीर झाला आहे.चुकवू नये अशी …नृत्य,गाणी आणि कलावंताच्या सन्मानाची रम्य सायंकाळ मानल्या जाणाऱ्या सलाम पुणे च्या रंगभूमी दिन सोहळ्यात हे पुरस्कार भारत सरकारचे केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक ,आणि राज्याचे माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके तसेच शहर कॉंग्रेस चे अध्यक्ष रमेश बागवे , अरविंद शिंदे, अविनाश बागवे ,भाजपचे आनंद रेखी , संदीप खर्डेकर नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, सुहास कुलकर्णी , उज्वल केसकर ,नगरसेवक गोपाळ चिंतल ,राष्ट्रवादीचे महापालिकेतील विपक्ष नेते चेतन तुपे पाटील ,सुभाष जगताप आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे .अभिनेत्री आणि निर्माती तृप्ती भोईर ,हॉलीवूडचा बेस्ट अक्ट्रेस पुरस्कार विजेती बॉलीवूड ची अभिनेत्री किरण दुबे, दाक्षिणात्य सिनेमा गाजविणारी मराठी अभिनेत्री डिम्पल चोपडे यांच्यासह असंख्य मान्यवर कलावंतांच्या उपस्थितीत हा सोहळा होतो आहे . येत्या रविवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे हा सोहळा संपन्न होतो आहे . अभिनेता मयूर लोणकर ,अभिनेत्री मालविका बर्वे, नृत्यदिग्दर्शक सचिन घोरपडे आदी कलावंताच्या संचाकडून यावेळी गाणी नृत्य अशा बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.ज्यामध्ये विविध कलाकारांच्या गुणांचे अविष्कार रसिकांना पहायला मिळतील .तर स्वरध्यास संगीत विद्यालयाचे दत्तप्रसाद पांडे यांच्या मराठी गायनाच्या कार्यक्रमाचा यात समावेश आहे . हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामुल्य असून पहिल्या 5 रांगा, मान्यवर पाहुणे,कलाकार ,नगरसेवक आणि पत्रकार यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत .ज्येष्ठ सिनेपत्रकार आणि लेखक सुभाषचंद्र जाधव या कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि निवेदन करणार आहेत .
चुकवू नये अशी … कलाविष्कार आणि कलावंताच्या सन्मानाची सायंकाळ ‘रंगभूमी दिन सोहळा ‘