जॅकी श्रॉफ राऊंड टेबल इंडियाचे नवे ब्रँड अॅम्बेसिडर(व्हिडीओ)
पुणे: १९६२ साली स्थापना झालेली राऊंड टेबल इंडिया एक गैर-राजकीय, असांप्रदायिक आणि विना नफा तत्वावर कार्यरत गैर-सरकारी संस्था आहे. १८ ते ४० वयोगटातील तरुण व यशस्वी लोक राऊंड टेबल इंडियाचे सदस्य आहेत. समुदाय सेवा, स्वयं विकास, शिष्यवृत्ती व अंतर-राष्ट्रीय संबंध सुधरवण्याच्या उद्देशाने हे कार्य २० ते २५ सदस्यांच्या ‘टेबल्स’ द्वारे सुरू आहे. राऊंड टेबल इंडिया ही राऊंड टेबल इंटरनॅशनलची सक्रिय सदस्य आहे.
आज राऊंड टेबल इंडियाने बॉलिवूड स्टार जॅकी श्रॉफ यांना त्यांच्या ब्रँड अॅम्बेसिडरपदी नियुक्त केले आहे. राऊंड टेबल इंडिया आणि जॅकी श्रॉफ यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला. ह्यावेळी राऊंड टेबल इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष क्रिस अरविंथ, राऊंड टेबल इंडियाच्या एरिया १५ चे चेअरमन अविनाश अगरवाल, राऊंड टेबल इंडियाच्या पीएसआरटी-१७७ चे चेअरमन टीआर ललित पिट्टी, राऊंड टेबल इंडियाच्या एरिया १५ चे पब्लीसीटी कनविनर दर्शन काबरा व राऊंड टेबल इंडियाच्या नॅशनल सीएसआर टीमचे विकाश अगरवाल उपस्थित होते.
अभिनेत्री किरण दूबे, आणि प्रसिद्ध उद्योजक सागर चोरडिया, चेतन तुपे, संजय काकडे, सुभाष सणस, राजेंद्र वागस्कर व पीकेसी बोस या विशेष प्रसंगी उपस्थित होते. राऊंड टेबल इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष क्रिस अरविंथ यांच्या स्वागत संभाषणानाने ह्या कार्यक्रमाचा आरंभ झाला. त्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले आणि राऊंड टेबल इंडियाच्या कार्यकालाची माहिती दिली.
“राऊंड टेबल इंडिया चे एरिया १५ चे चेयरमन अविनाश अगरवाल यांनी नव्याने सुरू होनार्या उपक्रमांची माहिती दिली ते म्ङणाले कि, सप्टेंबर मध्ये पुण्यामध्ये ३ नव्या शाळांची पायाभरणी करनार आहोत. शिक्षण ही माझ्यासाठी नेहमीच एक प्रमुख बाब राहीली आहे ज्यामुळे हे कार्य माझ्यासाठी खुप आनंददायी आहे.
राऊंड टेबल इंडिया भारतामध्ये जवळपास ५० वर्षेांपासून कार्यरत असून ३०० चॅप्टर्सच्या ४ हजार सदस्यांसोबत ते ३५ शहरांमध्ये सक्रिय आहेत. येत्या सप्टेंबरमध्ये पुण्याजवळ ते ३ नव्या शाळांचा पाया रचणार आहेत.
शिक्षणक्षेत्रात लक्षणीय बदल घडविण्यात राऊंड टेबल इंडिया आतापर्यंत यशस्वी राहिला आहे. अत्तापर्यंत त्यांनी देशभरात ५,३७७ शाळा वर्ग व २,१७२ शाळांची उभारणी केली आहे. 2003 साली सुरू केलेल्या ‘फ्रीडम थ्रू एज्यूकेशन’ ह्या राष्ट्रीय प्रकल्पाद्वारे त्यांनी वंचित मुलांना यशस्वीरीत्या शिक्षण उपलब्ध करून दिले जात आहे.
अत्यंत लोकप्रिय व सुप्रसिद्ध व्यक्ती राऊंड टेबल इंडियाचे ब्रँड अॅम्बेसिडर होऊन गेले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान, एफ १ रेसर नारायण कार्तिकेयन व कन्नड चित्रपट अभिनेते पुनीत राजकुमार यांच्यासारख्या लोकप्रिय व्यक्तींनी राऊंड टेबल इंडियाच्या प्रकल्पांना समर्थन देत त्याचे प्रतिनिधित्व केले आहे.