पुणे-आज सकाळी बारामती लोकसभेच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे शिरूर लोकसभेचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे मावळ लोकसभेचे उमेदवार पार्थ दादा पवार पुणे शहराचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष चेतन तुपे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर रोहित पवार यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली सुमारे 20 मिनिटं ही भेट झाली या भेटीदरम्यान राहुल जी गांधी यांच्याबरोबर महाराष्ट्रातील दुष्काळ पाणीटंचाई बेरोजगारी वाढती महागाई शेतकऱ्यांचे प्रश्न लोकांसाठी केलेला जाहीरनामा त्यातील मुद्दे आदी बाबत सविस्तर चर्चा झाली तसेच राहुल यांना उमेदवारांची व पदाधिकाऱ्यांचीओळख करून दिली अशी माहिती राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील यांनी कळविली आहे.