कवीवर्य ग. दि. माडगूळकर नगरी (पुणे) – महामहोपाध्य़ाय दत्तो वामन पोतदार यांच्या शनिवारपेठेतील
निवासस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी यांनी त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून, सरस्वतीपूजन व
ग्रंथपूजन करून पहिल्या शिक्षक साहित्य संमेलनाच्या ग्रंथ दिंडीचा शुभारंभ केला. आपल्याकडच्या पारंपारिक
पंतोजींपासून सुरू झालेल्या शिक्षणाच्या दालनात आलेल्या नव्या अधुनिक डिजिटल शाळांपर्यंत गेल्या अनेक
वर्षात शिक्षणात झालेल्या सुधाऱणांचे दर्शन पुणेकरांना या ग्रंथ दिंडीने घडवले.
पहिले शिक्षक साहित्य संमेलन पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात कविवर्य ग. दि. माडगूळकरनगरीत भरले आहे.
त्याचा शुभारंभ ग्रंथ दिंडीने झाला. अहिल्यादेवी आणि रमणबाग शालेतील विद्यार्थ्यांची ढोललेझीमची पथक,
पारंपारिक वेषभूषेतील शिक्षणासंबधी महिती देणारे फलक घेतलेले विद्यार्थी – विद्यार्थीनी, शाळांचे
मुख्याध्यापक, शिक्षक असा लवाजमा या दिंडीत होता. डॉ. न. म. जोशी यांच्यासह संमेलनाचे स्वागताध्यक्ष
आमदार विजय काळे यांनी द. वा. पोतदारांच्या प्रतिमेस आदरांजली वाहिली. सरस्वतीच्या प्रतिमेचे व ग्रंथांचे
पूजन करून मान्यवरांनीच पालखी आपल्या खांद्यावर घेत या दिंडीचा प्रारंभ केला.शिक्षणाधिकारी डॉ. गणपत
मोरे, दीपक माळी, शिवजी दौंडकर, अहिल्यादेवी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुलभा पांढरे, रमणबाग
प्रशालेच्या मुख्याध्यापिका तिलोत्तमा रेड्डी, मुख्यध्यापक संघाचे अध्यक्ष महेंद्र गणपुले, सचिव नंदकुमार सागर,
कार्याध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड, माधवी पांढारकर, अंजली गोरे, दर्शना