एक लाख रूपये रोख आणि बालशिवाजींची सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरित असलेली प्रतिमा, पुण्याच्या ग्राम देवतांसह असलेल्या या वैशिष्ठपूर्ण स्मृतिचिन्हाने या वर्षीचे पुण्यभूषण पुरस्कार्थी डॉ.के.एच.संचेती यांना गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने देण्याचे ठरविले आहे. जुलै महिन्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या आधी ‘पुण्यभूषण पुरस्कार’ ज्येष्ठ गायक कै.पं.भीमसेन जोशी, राजा दिनकर केळकर संग्रहालयाचे कै.काका केळकर, कै.शंतनुराव किर्लोस्कर, कै.डॉ.बानुबाई कोयाजी, सुप्रसिद्ध साहित्यिक कै.पु.ल.देशपांडे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, योगाचार्य बी.के.अय्यंगार, कै.डॉ.रा.ना.दांडेकर, डॉ. मोहन धारिया, डॉ.जयंत नारळीकर, कै.प्रतापराव गोडसे, ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदू बोर्डे, कै.जयंतराव टिळक, डॉ.जब्बार पटेल, राहुल बजाज, कै.डॉ.के.बी.ग्रँट, विख्यात नृत्यसाधिका कै.डॉ.रोहिणी भाटे, डॉ.बाबा आढाव, ज्येष्ठ अभिनेते डॉ.श्रीराम लागू, शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर, डॉ.शां.ब.मुजुमदार, डॉ.रा.चिं.ढेरे, डॉ.ह.वि.सरदेसाई, निर्मला पुरंदरे, सुधीर गाडगीळ, डॉ.सायरस पूनावाला, प्रतापराव पवार आणि श्री.भाई वैद्य या मान्यवरांना प्रदान करण्यात आले होते.