पुणे मॉन्सून अश्वशर्यतीं हंगाम 2019
पुणे-: पुणे मॉन्सून अश्वशर्यतीं हंगाम 2019 या स्पर्धेत द पुणे डर्बी हि ग्रेड 1 दर्जाची प्रतिष्ठेच्या अश्वशर्यतीत त्रोवेल या घोड्याने 2000 मीटर अंतरावरच्या या मुख्य शर्यतीमध्ये चमकदार कामगिरी करत विजय मिळवला.
रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब(आरडब्लूआयटीसी)येथे सुरु असलेल्या या स्पर्धेच्या द पुणे डर्बी हि ग्रेड 1 दर्जाच्या अश्वशर्यतीत राजेश मोंगा यांच्या मालकीच्या त्रोवेल या घोड्याने 2मिनिट 03 सेकंद आणि 512 मिनिसेकंद वेळ नोंदवत पहिला क्रमांक पटकावला. याचा जॉकी सीएस जोधा आणि एस के सुंदरजी हा प्रशिक्षक होता. तर दुसरा क्रमांक विझार्ड ऑफ स्टोक्स या घोड्याने पटकावला. याचा जॉकी नीरज रावळ आणि पी श्रॉफ प्रशिक्षक होता.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:
विजेता: त्रोवेल उपविजेता: विझार्ड ऑफ स्टोक्स