– मुख्यमंत्री खेचणार काय ‘या ‘ पोलीस अधिकाऱ्यांचे कान ?
पुणे- हेल्मेट सक्तीवर अगोदर शिवलेली आणि अखेरीस उचकटू पाहणी तोंडं आज पुण्यात येणाऱ्या मुख्यमंत्र्यांसमोर तरी आ वासून बोलतील काय ? आणि पोलीस कमिशनर आणि डेप्युटी कमिशनरांनी चालविलेल्या हेल्मेट सक्ती चा फज्जा उडविण्यासाठी ‘सीएम शस्त्र’ वापरतील काय हे आजच पुणेकरांना दिसून येणार आहे .
आज दुपारी दिड वाजता पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत आहेत . आणि ते प्रथम पोलीस कमिशनरांच्या कार्यालयात जाणार आहेत . आता तिथे ते त्यांना शाबासकी देतात कि ,’थांब भाऊ ..आता पुरे ‘ असे म्हणत पुणेकरांना ‘दिलासा देतात .. ते पहायचे आहे .आणि त्याबरोबरच भाजपचे 8 आमदार 1 खासदार आणि दुसरे सहयोगी खासदार यापैकी कोण कोण आज मुख्यमंत्र्यांना पुण्यात भेटतील ..आणि भेटल्यानंतर ते हेल्मेट सक्ती वर त्यांच्यापुढे तोंड कसे उघडतील ..हे देखील . असे तसे ..किंवा तातडीने किंवा उशिरा का होईनात समजणार आहे . आणि त्याचा मुख्यमंत्र्यावर किती प्रभाव पडतो तेही समजणार आहे . तेव्हा .. आता पाहू यात .. दुपारी मुख्यमंत्री पुण्यात आल्यावर माध्यमे काय काय बातम्या देताहेत त्याकडे पुणेकरांचे लक्ष लागून राहणार आहे ….
दरम्यान …भाजप मधील कोथरूडच्या आमदार 2 वर्षापूर्वी हेल्मेट सक्तीच्या विरोधात आंदोलन करताना काय बोलल्या होत्या त्याचा जुना व्हिडीओ आम्ही येथे देत आहोत.तो पहाच …