पुणे- मित्रमंडळ चौकातील व्होल्गा चौकानजीकचा ९ एकराचा भूखंड बळकावणाऱ्या बिल्डरवर तातडीने पोलिसात तक्रार दाखल करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आज येथे नगरसेवक सुभाष जगताप यांनी महापालिकेसमोर निदर्शने करीत त्यानंतर आयुक्तांना भेटून केली .
गेले काही दिवस याबाबत जगताप यांनी कारवाईची मागणी सुरुठेवली आहे . हा भूखंड अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच बिल्डरने लाटल्याचा आरोपही त्यांनी केला .या भूखंडाबाबत चे वृत्त स्थानिक दैनिकातुन हि अनेक दिवस प्रसिध्द होते आहे. एका दुरचीत्रवाहीनीने संबधित भूखंडावर विशेष रिपोर्ट सदर केला आहे .भूखंडा लगत जगताप यांची मुलाखत घेतली आणि संबधित बिल्डरचे हि म्हणणे मांडले . या बिल्डरचे म्हणणे हि जागा माझीच आहे ,पालिकेने आपली जागा शोधावी असे म्हणणे त्याद्वारे मांडले . पण पालिकेच्या स्तरावरून अगर जिल्हाधिकारी यांच्या स्तरावरून याबाबत कोणताही खुलासा करण्याची तसदी घेण्यात आली नाही …