पुणे- बहुचर्चित उद्योजक अविनाश भोसले तसेच काँग्रेस नेते ,भारती विद्यापीठाचे पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजीत कदम यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकले
अविनाश भोसले आणि विश्वजीत कदम या दोघांच्याही निवासस्थान आणि कार्यालयांवर हे छापे पडले .आयकर विभागाचे अधिकारी सध्या तपासणी करत आहेत. सुरक्षेसाठी स्थानिक पोलिसांचीही मदत घेण्यात आली आहे.
अविनाश भोसले यांच्या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे फोन काढून घेतले आहेत. अशीच तपासणी विश्वजीत कदम यांच्या कार्यालयातही सुरू आहे. अविनाश भोसले आणि विश्वजीत कदम यांच्या कोण-कोणत्या कार्यालयांवर छापेमारी झाली आहे, याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.