पुणे- मी जरूर मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो पण त्याचा अर्थ असा नाही कि मी माझी भूमिका बदलली ,मी माझ्या कॉंग्रेस प्रवेशाच्या भूमिकेवर ठाम आहे असे स्पष्टीकरण खासदार संजय काकडे यांनी ‘माय मराठी ‘ कडे फोन वर संपर्क साधून केले आहे .
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला काकडे संध्याकाळी मुंबईतील वर्षा बंगल्यावर गेले तेव्हा माध्यमांमध्ये आणि सामिक्षकांमध्ये याबाबत राजकीय चर्चेला उत आला . आणि काकडे भाजप च्या सानिध्यात राहणार कि कॉंग्रेस मध्ये जाणार यावर खलबते सुरु झाली . या सर्व प्रकाराबाबत काकडे यांनी माय मराठी कडे सविस्तर खुलासा केला आहे. ते म्हणाले मी मित्र म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि मित्र म्हणून संबध कायम राहतील असे पुन्हा स्पष्ट करतो . मी कॉंग्रेस मध्ये जाण्याच्या निर्णयावर ठाम आहे . कुणीही चुकीचा अर्थ काढू नये अशी माझी विनंती आहे ,.