पुणे :
‘स्मार्ट सिटी’मध्ये आधुनिक सुविधा मिळणार आहेत. त्या सुविधा महिलांना मिळाव्यात, कोणत्याही सुविधांसाठी झगडावे लागू नये, स्त्रियांना संधी मिळाली तर सर्वांची प्रगती होते, असे प्रतिपादन पुणे पालिकेच्या वरिष्ठ विधी सल्लागार मंजुषा इधाटे यांनी केले.
‘पुणे फेस्टिव्हल’ आणि निवेदिता प्रतिष्ठान आयोजित चित्रकारांच्या पेटींग स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. मंजुषा इधाटे तसेच ‘इंदिरा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर’च्या प्राचार्य डॉ. सुप्रिया नेने यांनी या स्पर्धेचे पारितोषिक वितरण आणि प्रदर्शनाचे उद्घाटन केले. सिद्धेश भोबे हे अध्यस्थानी होते.
यावेळी मोहन टिल्लू अनुराधा भारती, शेखर साने उपस्थित होते. सुनील गोकर्ण, हेमंत बागूल, प्रशांत तळणीकर, शेखर साने यांनी परिक्षण केले. माधुरी ढमाले यांनी सूत्रसंचालन केले.