पुणे-भाजपा सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणाविरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या चिटणीस सोनलबेन पटेल यांच्या नेतृत्वाखाली फडके चौकातून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचे 8 नोव्हेम्बर रोजी सकाळी मोर्चा नेला.
या आंदोलनात शहराध्यक्ष रमेश बागवे, बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, अविनाश बागवे, नीता राजपूत आदि मान्यवर या आंदोलनात सहभागी झाले . नोटबंदी, जीएसटीमुळे देशात मोठी मंदी आहे.तरुणांच्या हाताला काम नाही. छोट्या छोट्या कंपन्या बंद पडत आहेत. मोठ्या कंपन्यांही याचा फटका बसला आहे. लोकांच्या खिशातून मोदी सरकारने पैसा काढून घेतला आहे. शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. या सर्व बाबींचा विचार करून मोदी सरकार विरोधात काँगेस आक्रमक झाली आहे. या आंदोलनात ‘मोदी सरकार हाय हाय, बीजेपी सरकार हाय हाय’, अशा घोषणा देण्यात आल्या.