मुंबई:काल पुण्याच्या कॉंग्रेस भवनात जावून पुणे शहर कॉंग्रेस अध्यक्ष रमेश बागवे यांची भेट घेतलेले संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी आज मुंबईत जे ष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.मुंबईमध्ये काँग्रेसची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यात ही घोषणा करण्यात आली आहे.दरम्यान, पुण्याच्या उमेदवारीची घोषणा संध्याकाळपर्यंत करण्यात येईल असंही मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्ट केलं आहे. रावेरमधून डॉ. उल्हास पाटील यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी महाराष्ट्रात येणार असल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे. तर पुण्याच्या जागेचा तिढा अद्याप संपला नसल्याचंही ते म्हणाले. त्यामुळे गायकवाड यांना पुणे लोकसभेची उमेदवारी देण्यात येणार का, याबाबतची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे.
कोण आहे प्रवीण गायकवाड..
– शिवाजी महाराजांच्या पत्नी सकवारबाई गायकवाड यांचे थेट वंशज.
– पुण्यातील मुंढवा हे मूळ गाव
– कराड गव्हर्नमेंट कॉलेजमधून सिव्हिल इंजिनीयरिंग
– प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक
– 65 पेक्षा जास्त देशांचे अभ्यास दौरे
– 29 पेक्षा जास्त देशात शिवजयंती साजरी करण्यात महत्वाचा वाटा
– गेली 25 वर्षं सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख
– संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष
– शेतकरी कामगार पक्षाचे सहचिटणीस
– मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक
प्रवीण गायकवाड यांचा गेल्या 25 वर्षातील प्रवास
– पुणे शहर आणि संपूर्ण महाराष्ट्रात कार्यकर्त्यांची मोठी फळी
– परदेशात intellectual class सोबत जिव्हाळ्याचे संबंध
– केवळ मराठा नाही तर मुस्लिम, दलित-ओबीसी आणि युवकांना आपलासा वाटणारा तरुण चेहरा