दिवाळीत शेतकऱ्यांना गायींची भेट !
पुणे :
दिवाळीच्या सणाचा मुहूर्त साधून रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड च्या वतीने मुळशी तालुक्यातील होतले गावी शेतकऱ्यांना ८ गायीं भेट देण्यात आल्या . वसुबारसेच्या दिवशी हा उपक्रम करण्यात आला . येत्या महिन्यात एकूण २५ गायी दान करण्यात येणार आहेत . या गावात रोटरीचा उत्तम गोठा बांधकाम , अद्ययावत गोपालन प्रशिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचा प्रकल्प सुरु आहे . या प्रकल्पांतर्गत या गायी देण्यात आल्या .
रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड चे अध्यक्ष अशोक भंडारी ,प्रोजेक्ट चेअरमन सुरेश नारके ,मिलिंद बिवलकर ,अनिता पंडित ,श्रीकांत पाटणकर ,सतीश खाडे उपस्थित होते