प्रथमोपचार आणि आगीपासून संरक्षणाचे विद्यार्थिनींना प्रशिक्षण
आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालयाचा उपक्रम
पुणे :प्रथमोपचार आणि आगीपासून संरक्षणाचे प्रशिक्षण महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींना देण्यात आले . डॉ स्वाती बजाज आणि देविदास लाड यांनी मार्गदर्शन केले आणि प्रात्यक्षिके दाखवली .उपप्राचार्य गफार सय्यद यांनी स्वागत केले . शुद्ध हरपणे ,साप चावणे ,आग ,श्वास घेण्यास अडचण ,जखमेवर प्रथमोपचार ,नाकातून रक्त येणे अशा अनेक गोष्टींवर मार्गदर्शन करण्यात आले . कृत्रिम श्वासोच्छवासाबद्दल देखील माहिती देण्यात आली .