‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त ‘ श्यामरंग ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . कृष्णाच्या विविध रुपांवर आधारित कथक नृत्य आणि शास्त्रीय गायनाच्या रचनांचे सादरीकरण या कार्यक्रमात केले गेले
कथक आणि शास्त्रीय रचनांमधून उलगडली श्रीकृष्णाची रूपे !
पुणे ः
.’नृत्यवेध ‘ प्रस्तुत हा कार्यक्रम शुक्रवार, २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ ते ८ वेळेत ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, (सेनापती बापट रस्ता) येथे झाला . ‘
या कार्यक्रमात डॉ माधुरी आपटे आणि त्यांच्या शिष्यानी श्रीकृष्णाच्या विविध रूपांचे कथक द्वारे सादरीकरण केले .किशोरी जानोरकर यानी शास्त्रीय रचना सादर केल्या.
. ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा ८३ वा विनामूल्य कार्यक्रम होता. भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनीस्वागत केले .
सुरवातीला किशोरी जानोरकर यांनी गायन करताना प्रारंभी राग ‘ बिहाग ‘ सादर केला. त्यातून कृष्णलीलांचे वर्णन सर्वांसमोर आणले.
संत तुकारामांचा ‘ पद्मनाभा, नारायणा ‘ हा अभंग ही त्यांनी शैलीदार पध्दतीने सादर केला. कथक नृत्यातील ताल प्रस्तुतीवर श्रीकृष्ण भक्तीचा प्रभाव आहे, तो या कार्यक्रमात सादर झालेल्या रास तालातूनही दिसला. ‘ नृत्यवेध ‘ संस्थेच्या विद्यार्थिनींनी कळशी नृत्यातून कृष्ण जन्म सोहळा साकार केला. त्याला रसिकांनी भरभरुन दाद दिली. .मल्हार रागावर आधारित नृत्यही विद्यार्थिनींनी सादर केले आणि कालियामर्दनाचा प्रसंगही जिवंत केला .भैरवीने सांगता झाली.