भारतीय विद्या भवनमध्ये रंगली मराठी -हिंदी लोकसंगीताची मैफल !
गवळण, कव्वाली, जोगवा, कोळीगीत आणि सुरेल शिवार गीतांची बरसात
पुणे ः‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘सुरभी ‘ या मराठी -हिंदी लोकसंगीताच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते . हा कार्यक्रम दि. १६ ऑगस्ट २०१९ रोजी , शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, (सेनापती बापट रस्ता) येथे रसिकांच्या जोरदार प्रतिसादात पार पडला .
‘अरुणिमा’ प्रस्तुत या कार्यक्रमात लोकसंगीतावर आधारित मराठी -हिंदी चित्रपट गीतांच्या विविध रचना सादर करण्यात आल्या .शेफाली साकुरीकर ,केतन गोडबोले ,अरुणा अनगळ यांनी त्या गायल्या. तर राजेंद्र हसबनीस ,नरेंद्र काळे ,ओंकार पाटणकर यांनी साथसंगत केली .‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले
‘ अरे संसार संसार ‘ या बहिणाबाईंच्या काव्याने मैफलीला सुरवात झाली. ‘ जाऊ देवाचिया गावा ‘ या अभंगाने रसिकांची मने जिंकली. ‘ मी डोलकर ‘ या कोळीगीताने वाहवा मिळवली.
‘ केसरिया बालमा ‘, ‘मोरनी बागा मां बोले ‘ ही लोकसंगीतावर आधारित हिंदी गीतेही साजरी करण्यात आली.
‘ गोऱ्या गोऱ्या गालावरी ‘ हे नवराई गीत ,’ आभाळाच्या मांडवाला भुईची रं आण, भेगाळल्या काळजाचं दान’ ही मनाला भिडणारी स्वरचित रचना, ‘ देवा तू पाठीराखा ‘ अशासारखी शिवार गीतेही अरुणा अनगळ यांनी सादर केली.
त्यांनी सादर केली.
‘ अरे कान्हा ‘ ही गवळण,
पंजाबी ढंगाच्या देशभक्तीपर गीत ‘ रंग दे बसंती चोला ‘ च्या तालावर उपस्थितांनी ठेका धरला. भोजपुरीतील ‘ पान खाये सैंय्या हमारो ‘ ही नौटंकी गीत, ‘ चढता सुरज धीरे धीरे ‘ ही कव्वाली , ‘ जाळीमंदी पिकली करवंदं ‘ , ‘ गं साजणी ‘ या लावण्या तसेच’आईचा जोगवा ‘ही दाद मिळवून गेले. ‘ मिले सूर मेरा तुम्हारा ‘ ने सांगता झाली
. ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा ८२ वा हा कार्यक्रम विनामूल्य होता.