विद्यार्थ्यांकडून बस चालकांसमवेत राखी पौर्णिमा साजरी
पुणे :महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘पी ए इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स,डिझाईन अँड एनिमेशन (वेदा ) ‘ च्या विद्यार्थ्यांकडून स्वारगेट बस डेपो येथे बस वाहक आणि बस चालकांसमवेत राखी पौर्णिमा साजरी करण्यात आली . विद्यार्थ्यांनी बस चालक ,कंडक्टर ना राखी बांधली आणि मिठाई भेट दिली . प्राचार्य आणि अधिष्ठाता डॉ ऋषी आचार्य ,प्राद्यापक वर्ग उपस्थित होता . ‘कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून आम्ही हा सण बसचालक ,वाहक यांच्यासमवेत साजरा केला ,त्यातून आमची सामाजिक बांधिलकी दृढ केली ‘,असे डॉ ऋषी आचार्य यांनी यावेळी सांगितले