भारती अभिमत विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयचे प्राचार्य डॉ आनंद भालेराव ,महिला अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस आर पाटील,लवळे येथील भारती अभिमत विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर एन पाटील आणि ‘आरपीजी झेन्सार टेक्नॉलॉजीज’ चे कौशल्य प्रशिक्षण प्रमुख अमोल नितवे ,सदस्य वैष्णवी बाजरे यांनी या करारावर सह्या केल्या .
भारती अभियांत्रिकी महाविद्यालय -झेन्सार मध्ये करार
पुणे :भारती अभिमत विद्यापीठचे अभियांत्रिकी महाविद्यालय आणि आरपीजी झेन्सार टेक्नॉलॉजीज
मध्ये कौशल्य प्रशिक्षण विषयक सामंजस्य करार करण्यात आला आहे .
विद्यापीठाच्या धनकवडी कॅम्पस मध्ये हा करार झाला .भारती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना अद्ययावत कौशल्ये प्रशिक्षण मिळण्यात या करारामुळे मदत होणार आहे . ‘उद्योगक्षेत्राला अपेक्षित असणाऱ्या नव्या तंत्रज्ञानाप्रमाणे ज्ञान अद्ययावत करण्यास, क्षमतावृद्धी करण्यास आणि रोजगारक्षम होण्यास मदत होणार आहे’असे अमोल नितवे यांनी सांगितले . ‘उद्योगक्षेत्र आणि शिक्षण क्षेत्र यांच्यात परस्पर सहकार्य गरजेचे आहे ‘ असे डॉ आनंद भालेराव यांनी सांगितले . भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रशिक्षण आणि प्लेसमेंट विभागप्रमुख प्रा. नचिकेत कुलकर्णी यांनी आभार मानले