‘आनंदवन ‘ फॉरेस्ट येथे औषधी वनस्पतींची लागवड -अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी चा पुढाकार
पुणे :
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी च्या वतीने आनंदवन ‘ फॉरेस्ट(कोंढवा ) येथे औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली . ‘वन महोत्सव २०१९’ अंतर्गत या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी ही लागवड केली . प्राचार्य डॉ . किरण भिसे ,विभागीय वन अधिकारी श्रीमती लक्ष्मी ,’आनंदवन मित्र मंडळ ‘चे अध्यक्ष आनंद कुमार , राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा . दिलनवाझ पठाण उपस्थित होते . ११ जुलै रोजी हा कार्यक्रम पार पडला .