हज यात्रा मार्गदर्शन शिबिरात १५०० यात्रेकरूंचा सहभाग
पुणे :’खुद्दाम-ए -हुजाज’ या सामाजिक संस्थेने आयोजित केलेल्या दोन दिवसीय हज यात्रा पुणे जिल्हास्तरीय मार्गदर्शन शिबिरात १५०० यात्रेकरूंनी सहभाग घेतला.आझम कॅम्पस येथे हे मार्गदर्शन शिबीर २२ आणि २३ जून रोजी आयोजित करण्यात आले होते. हज यात्रेचा प्रवास ,नियम ,धार्मिक विधी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
खुद्दाम-ए-हुजाज’ तर्फे १२ वर्षे हजयात्रेकरूना अर्जभरण्यापासून विमानात बसेपर्यंतच्या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन करते आणि प्रशिक्षण देते. महाराष्ट्र प्रदेश हज कमिटी च्या अधीन राहून हे कार्य केले जाते.
शिबिराचे उद्घाटन शनिवारी ऑल इंडिया हज कमिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मकसूद खान यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी खुद्दाम-ए-हुजाज’चे अध्यक्ष सय्यद रियाझ काझी,सरचिटणीस भाईजान काझी,डॉ. पी ए इनामदार,मुनवर पिरभॉय व्यासपीठावर उपस्थित होते . समारोप रविवारी झाला .
सय्यद मुनाफ ,मुन्ना शेख ,इद्रीस मेमन खालू ,मेहबूब शेख ,उस्मान शेख मन्सूर काझी यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले