प्रीती बामणेला आयआयटी (मुंबई )ची फेलोशिप
पुणे :
भारती अभिमत विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रीती बामणे हिला आयआयटी मुंबई ची ‘फॉसी समर २०१९’फेलोशिप मिळाली आहे.’फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर इन एज्युकेशन (फॉसी) असे या फेलोशिप चे नाव आहे.प्रीती बामणे ही भारती अभिमत विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स विभागात दुसऱ्या सत्राची विद्यार्थिनी आहे.प्राचार्य डॉ. आनंद भालेराव यांनी तिचे अभिनंदन केले. अभियांत्रिकीच्या भारतातील ३० लाख विद्यार्थ्यांमधून साधारणपणे २० हजार विद्यार्थी प्रकल्प सादर करतात ,त्यातून निवड करण्यात येते.निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मुंबई आयआयटी येथे ६ आठवडे प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र दिले जाते.