पी ए इनामदार इन्फर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ऍकेडमी (पै आयसीटी )च्या संचालक मुमताज सय्यद यांनी स्वागत केले आणि उपक्रमाची माहिती दिली . डॉ पी ए इनामदार यांनी प्रशिक्षकांचे कौतुक केले . ‘गरीब आणि मागास विद्यार्थ्यांना संगणक क्रांतीद्वारे प्रगतीची मोठी झेप घेणे शक्य आहे . त्यामुळे संगणक प्रशिक्षण हा आपल्या शिक्षणात प्राधान्याचा विषय असला पाहिजे ‘,असे प्रतिपादन त्यांनी केले
पी ए इनामदार इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी ऍकेडमी तर्फे संगणक प्रशिक्षकांचे राज्यव्यापी प्रशिक्षण
पुणे :पी ए इनामदार इन्फर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ऍकेडमी (पै आयसीटी ) तर्फे संगणक प्रशिक्षकांचे राज्यव्यापी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते . पुणे मनपा ,स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा आणि इतर शाळांमध्ये संगणक प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांसाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते . ३१ जणांच्या उन्हाळी प्रशिक्षण वर्गाचा समारोप ३१ मे रोजी झाला . या तुकडीतील ११ गुणवान प्रशिक्षकांना प्रत्येकी १० हजार रोख पारितोषिक महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार यांच्या हस्ते देण्यात आले. हा कार्यक्रम आझम कॅम्पस (पुणे कॅम्प ) येथे झाला .
राज्यभरातून आलेल्या या प्रशिक्षकांच्या पहिल्या तुकडीला हार्डवेअर ,सॉफ्टवेअर मधील अद्ययावत कौशल्ये शिकविण्यात आली . १ मे पासून १६ मे दरम्यान हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते . राज्यातील साडेसात हजार विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षक अद्ययावत कौशल्ये प्रशिक्षणामुळे शिकवू शकतील .
शबाना सय्यद ,अरिफ सय्यद ,शमशेर सय्यद ,पंकज शिंदे ,नझीम शेख ,आलिया सय्यद ,निखत शेख या मुख्य प्रशिक्षकांनी पहिल्या तुकडीला संगणक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले .
———————–