भारती विद्यापीठ ‘आयएमईडी’ च्या ‘मेगा जॉब फेअर ‘ मध्ये ५० कंपन्यांचा सहभाग
पुणे :
‘भारती अभिमत विद्यापीठ ‘च्या ‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट ‘आयएमईडी’ मध्ये शनिवारी,२५ मे २०१९ रोजी ‘मेगा जॉब फेअर ‘ चे आयोजन करण्यात आले होते . ‘एपीजी लर्निंग्स ‘ च्या सहकार्यांने सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेसहा या वेळेत झालेल्या या मेगा जॉब फेअर मध्ये ५० कंपन्या १२०० जॉबसंधी घेऊन सहभागी झाल्या .
‘ सिमेंटेक’ कंपनीच्या मनुष्य बळ विकास विभागाचे प्रमुख सुधांशू पंडित यांनी उद्घाटन केले . ‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट ‘आयएमईडी’ चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर अध्यक्ष स्थानी होते. हा कार्यक्रम आयएमईडी ‘च्या पौड रस्ता कॅम्पस मध्ये झाला.
बँकिंग ,एचआर ,मॅन्युफॅकचरिंग ,आय टी ,बीपीओ ,सेल्स ,मार्केटिंग अशा विविध क्षेत्रातील कंपन्यांचा या मेगा फेअर मध्ये सहभाग होता. युवक -युवतींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती .