पुणे :
‘भारती अभिमत विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग ‘ (पुणे ) ला राष्ट्रीय सर्वेक्षणात १३ वे मानांकन मिळाले आहे . ‘भारती अभिमत विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग ‘ (पुणे ) चे प्राचार्य डॉ. आनंद भालेराव यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली . दिल्लीतील ‘मार्केटिंग अँड डेव्हलपमेंट रिसर्च असोसिएट्स’ आणि ‘इंडिया टुडे ‘या संस्थांनी संयुक्तपणे केलेल्या १२०७ अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सर्वेक्षणात हे मानांकन मिळाले आहे .खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या श्रेणीत हे मानांकन मिळाले आहे . भारताच्या पश्चिम विभागात या महाविद्यालयाला तिसरे स्थान मिळाले आहे .
‘शैक्षणिक गुणवत्ता ,पायाभूत सुविधा ,रोजगार संधी ,व्यक्तिमत्व आणि नेतृत्व विकसन अशा अनेक मुद्द्यांवर हे सर्वेक्षण देशभर झाले . नोव्हेंबर २०१८ ते एप्रिल २०१९ असा या सर्वेक्षणाचा कालावधी होता .
‘भारती अभिमत विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग ‘ ने गुणवत्ता विकसनाची आणि प्रशासनाची विविध पातळ्यांवर प्रभावी आणि अभिनव कार्य पद्धती निर्माण केली आहे. उत्तम पायाभूत सुविधा ,तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि भविष्यवेधी समुपदेशन याद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे हे मानांकन प्राप्त झाले ,’ असे प्राचार्य डॉ. आनंद भालेराव यांनी सांगितले .