३ मे रोजी भारतीय विद्या भवनमध्ये आयोजन
पुणे ः‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘दिव्य विवाहम ‘:पौराणिक विवाह परंपरेवर नृत्यरचना सादरीकरण’ ३ मे २०१९ रोजी आयोजित करण्यात आले आहे.
‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.
‘कलावर्धीनी चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि डॉ.उषा आर.के. हा कार्यक्रम सादर करणार आहेत.दि. ३ मे,शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता ‘भारतीय विद्या भवना’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता येथे हा कार्यक्रम होणार आहे.
अरुंधती पटवर्धन ,परिमल फडके(पुणे) ,प्राची सावे ,आनंद सच्चीदानंदन ,पवित्रा भट ,अपर्णा आणि निधग करुनाड (मुंबई ),रसिका किरण ,आदित्य पी .व्ही .,आदिती सदाशिवा ,मिथुन श्याम (बंगळुरू ),श्रेयसी गोपीनाथ(दिल्ली ) हे कलाकार सहभागी होणार आहेत .
‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत होणारा हा ७६ वा कार्यक्रम असून तो विनामूल्य आहे.