पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अमित सुर्वे यांचा महाराष्ट्र जोशी समाज संघटनेतर्फे सत्कार
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या मर्यादित विभागीय परीक्षा अंतिम परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन ,पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल अमित भरत सुर्वे यांचा महाराष्ट्र जोशी समाज संघटना (महाराष्ट्र राज्य) यांच्यावतीने आज सत्कार समारंभ पार पडला .
पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल सुर्वे यांचे महाराष्ट्र जोशी समाज संघटना व सर्व पदाधिकारी यांच्याकडून मनःपूर्वक अभिनंदन करून ,पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या .
निलेश प्रकाश निकम (उपाध्यक्ष महाराष्ट्र जोशी समाज संघटना,महाराष्ट्र राज्य) तानाजी सुर्वे,रामदास निकम, बाळासाहेब हेंद्रे, शैलेश हेंद्रे ,सुजित हांडे,गणेश जोशी, कुणाल हेंद्रे कार्यक्रमाला उपस्थित होते.
त्यावेळी निलेश प्रकाश निकम यांनी सुर्वे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.