निसर्ग,इतिहास,कला,साहित्य विषयक प्रेम ,रुजविण्यासाठी पिंपरी -चिंचवड , पुण्यामध्ये ‘जिप्सी क्लब’ ची स्थापना !
पुणे:आजच्या धकाधकीच्या, ताण तणावाच्या आयुष्यात प्रत्येकाला निसर्ग , कला, संगीत , इतिहासप्रेमात रममाण करण्यासाठी उद्योगनगरी पिंपरी -चिंचवड आणि विद्यानगरी पुण्यात ‘जिप्सी क्लब ‘ची स्थापना होत आहे .
युवक ,युवती ,महिला आबाल वृद्धाना हे नवे दालन उपलब्ध होत आहे.
संस्थापक निनाद थत्ते यांनी ही माहिती दिली .
पिंपरी -चिंचवड ,पुणे या ठिकाणी जिप्सी क्लबचे उपक्रम आयोजित केले जाणार आहेत . भटकंती , ट्रेकिंग पासून साहित्य ,संगीत ,कला अशा गोष्टींचा आस्वाद घेण्यासाठी या क्लबची स्थापना करण्यात येत आहे .
प्रत्येक महिन्यात अशी वेगळी वाट धुंडाळणारे भटकंती, साहित्य,संगीत ,कला अशा क्षेत्रातील जिप्सीशी गप्पा ,साहस,निसर्ग,इतिहास अशा विषयांवर आधारित वर्षातून एक चित्रपट महोत्सव /रसग्रहण ,अनुभव कथन,फोटो आणि पेंटिंग्ज ,त्यांनी जोपासलेल्या छंदाचे प्रदर्शन ,दासबोध अभ्यास वर्ग असे उपक्रम हाती घेतले जाणार आहेत .
शास्त्रीय पद्धतीने दुर्ग संवर्धनासाठीचे प्रयत्न , स्मृतिवन – डोंगर /गडांवर शास्त्रीय पद्धतीने वृक्षारोपण, अक्षय ऊर्जा असे उपक्रमही हाती घेतले जाणार आहेत . अधिक माहितीसाठी,नोंदणीसाठी जिप्सी क्लब ,निनाद थत्ते ,मोबाईल नंबर 96899 38912 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे .