भारती विद्यापीठ ‘आयएमईडी ‘च्या विद्यार्थ्यांना ५४ लाखापर्यंतची प्लेसमेंट ऑफर !
पुणे :भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट ( ‘आयएमईडी ‘) व्यवस्थापनशास्त्र शाखेच्या (एमबीए )विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये वार्षिक ७ ते ५४ लाखापर्यंतच्या प्लेसमेंट ऑफर मिळाल्या आहेत ! ‘आयएमईडी ‘ संचालक डॉ . सचिन वेर्णेकर यांनी ही माहिती दिली . १७१ हून अधिक विद्यार्थ्यांना ‘ब्लू चिप ‘ कंपन्यात प्लेसमेंट ऑफर मिळाल्या आहेत .
६० पेक्षा अधिक कंपन्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट मध्ये फेब्रुवारी महिन्यात कॅम्पस इंटरव्यू घेतले . त्यात विद्यार्थ्यांना करियरच्या मोठ्या प्लेसमेंट ऑफर मिळाल्या . भारतीय कंपन्यात या विद्यार्थ्यांना १६लाख १० हजाराची वार्षिक ऑफर मिळाली तर आंतरराष्ट्रीय कंपन्यात ५४ लाख रुपयांची वार्षिक ऑफर मिळाली . या कंपन्यांमध्ये अमेझॉन ,रिलायन्स ,कॅपजेमिनी ,आयटीसी ,आदित्य बिर्ला कॅपिटल ,आयसीआयसीआय ,विप्रो ,टेक महिंद्रा ,अपोलो ,नोकरी डॉट कॉम ,उंनो मिंडा यांचा समावेश आहे .
‘आयएमईडी ‘ विद्यार्थ्यांना समर इंटर्नशिपच्या ऑफर्स देखील प्राप्त झाल्या आहेत . याआधी ५० विद्यार्थ्यांनी २ महिन्याची विंटर इंटर्नशिप पूर्ण केली आहे . यामध्ये त्यांना किमान मासिक २५ हजार रुपयांचे विद्यावेतन मिळाले . इंटर्नशिप देणाऱ्या कंपन्यात आदित्य बिर्ला कॅपिटल ,पतंजली ,बजाज फिनसर्व्ह अशांचा समावेश आहे ,असे डॉ वेर्णेकर यांनी सांगितले .
भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट ही भारताच्या टॉप ५० बी -स्कुल मध्ये समावेश असलेली इन्स्टिट्यूट असून ‘कार्पोरेट रिसोर्स सेल ‘ द्वारे प्लेसमेंटसाठी विशेष प्रयत्न केले जातात . अनेक राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय परिषदा ,इंडस्ट्री – इन्स्टिट्यूट पार्टनरशिप समिट ,अल्युमनी मीट,कार्पोरेट डे ,जॉब फेयर ,मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्रॅम ,फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम सारखे उपक्रम वर्षभर आयोजित केले जातात