‘मतदार जागृती परिषद’-स्वामी अग्निवेश ,तीस्ता सेटलवाड ,न्या . पी . बी . सावंत यांचा सहभाग
पुणे :‘मतदार जागृती परिषद’ या मंचातर्फे मतदार जागृतीसाठी १७ फेब्रुवारी रोजी पुण्यात सभेचे आयोजन करण्यात आले आहे . ‘लोकसभा निवडणूक आणि देशासमोरचे आव्हान ‘ विषयावर ही सभा होणार असून स्वामी अग्निवेश ,तीस्ता सेटलवाड ,न्या . पी . बी . सावंत (निवृत्त ),निरंजन टकले ,यशवंत मनोहर ,डॉ . श्रीपाल सबनीस यांचा प्रमुख सहभाग असणार आहे . अनेक सामाजिक कार्यकर्ते ,विचारवंत ,लेखक सहभागी होणार आहेत .
डॉ. कुमार सप्तर्षी (संस्थापक-अध्यक्ष युवक क्रांती दल) यांच्या अध्यक्षतेखाली रविवार, दिनांक १७ फेब्रुवारी २०१९,सकाळी ११ वाजता ,गणेश कला क्रीडा मंच (स्वारगेट जवळ ), पुणे येथे ही सभा होणार आहे .
‘ मतदार जागृती परिषद ‘ या मंचातर्फे आगामी उपक्रमांची माहिती देण्यासाठी शुक्रवारी दुपारी डॉ. कुमार सप्तर्षी (संस्थापक-अध्यक्ष युवक क्रांती दल) यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन श्रमिक पत्रकार संघ येथे करण्यात आले होते .
संदीप बर्वे (संघटक ,युवा क्रांती दल ),जांबुवंत मनोहर (संघटक ,युवा क्रांती दल ),मयुरी शिंदे (युवा क्रांती दल ,पुणे शहराध्यक्ष ), प्रशांत कोठडीया (मतदार जागृती परिषद) हे या पत्रकार परिषदेला उपस्थित होते .
राजकीय पक्षांबाहेरील परिघांमध्ये ‘मतदार जागृती परिषद’ कार्यरत राहणार असून पुढेही पुण्यात आणि राज्यभरात सभा आयोजित केल्या जाणार आहेत. पहिली सभा २० जानेवारी रोजी एस एम जोशी फाउंडेशन येथे झाली होती . त्यात डॉ .कुमार सप्तर्षी ,सुरेश खोपडे ,डॉ विश्वम्भर चौधरी ,श्रीरंजन आवटे ,प्रशांत कोठडीया ,मौलाना निजामुद्दीन सहभागी झाले होते . ७ फेब्रुवारी रोजी झालेल्या दुसऱ्या सभेत निरंजन टकले (पत्रकार ),डॉ . अभिजित वैद्य (राष्ट्रीय प्रमुख ,आरोग्यसेना ),श्रीरंजन आवटे (युवा लेखक),प्रशांत कोठडीया (मतदार जागृती परिषद) ,जांबुवंत मनोहर (संघटक ,युवा क्रांती दल ),सर्फराज अहमद (मध्ययुगीन इतिहासाचे अभ्यासक ),हे वक्ते सहभागी झाले होते .