भारती विद्यापीठ येथे ‘स्टाफ डेव्हलपमेंट प्रोग्रॅम ‘
पुणे :
भारती अभिमत विद्यापीठाच्या ‘लर्निंग अँड डेव्हलपमेंट सेंटर ‘ आणि भारती विद्यापीठ मेडिकल फाउंडेशन च्या वतीने ‘ स्टाफ डेव्हलपमेंट प्रोग्रॅम ‘या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . भारती विद्यापीठ धनकवडी कॅम्पस मध्ये हा कार्यक्रम नुकताच पार पडला . १०७ कर्मचारी सहभागी झाले . भारती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर च्या संचालक डॉ अस्मिता जगताप यांच्या हस्ते उद्घाटन झाले . व्यवस्थापन शास्त्र शाखेचे अधिष्ठाता आणि इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी )चे संचालक डॉ सचिन वेर्णेकर ,डॉ प्रमोद पवार ,गौतम सांबरे यांनी मार्गदर्शन केले . अर्चना सावंत यांनी आभार मानले