साहित्य प्रकारातील आईचे होणार विश्वरूप दर्शन !
पुणे :भारतीय विद्या भवन -इन्फोसिस फाऊंडेशन तर्फे सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत अंजली कऱ्हाडकर प्रस्तुत ‘ जननी ‘ एकपात्री प्रयोगाचे बुधवारी ,१२ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे .सरदार नातू सभागृह ,भारतीय विद्या भवन ,सेनापती बापट रस्ता येथे १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होईल ,अशी माहिती भारतीय विद्या भवन चे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकाद्वारे दिली .
‘जननी ‘ म्हणजे आईची महती साहित्यातील विविध प्रकारांमध्ये वर्णिली आहे . कथा ,कादंबऱ्या ,कविता ,नाटक यामधील आईची रूपे मांडणारा हा आगळा वेगळा एकपात्री प्रयोग अंजली कऱ्हाडकर सादर करणार आहेत .
भारतीय विद्या भवन -इन्फोसिस फाऊंडेशन च्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमातील हा ६३ वा कार्यक्रम आहे . हा कार्यक्रम विनामूल्य असून सर्वांसाठी खुला आहे .