‘धर्म आणि नैतिक मूल्ये ‘ विषयावर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा
आझम कॅम्पस तर्फे २२ डिसेंबर रोजी पुण्यात आयोजन
पुणे :आझम कॅम्पस तर्फे ‘धर्म आणि नैतिक मूल्ये ‘ विषयावर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली असून ही स्पर्धा शनिवार ,२२ डिसेंबर रोजी पुण्यात होईल .
हाजी गुलाम महंमद आझम एज्युकेशन ट्रस्ट ,महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी ,डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट या संस्थांनी संयुक्तपणे या स्पर्धेचे आयोजन केले आहे .
‘आधुनिक तंत्रज्ञान आणि धर्मातील नैतिक मूल्यांचा प्रसार ‘,’ इस्लाम धर्मातील कष्टाचे महत्व ‘,’विविध धर्मातील नैतिक मूल्ये ‘असे विषय या वक्तृत्व स्पर्धेसाठी आहेत . मराठी ,हिंदी ,इंग्रजी या तीन भाषांत आठवी ते दहावी ,अकरावी -बारावी ते डी . एड . ,आणि पदवी -व्यावसायिक अभ्यासक्रम अशा तीन गटात ही स्पर्धा होईल .
प्रत्येक विषयाच्या ,प्रत्येक गटातील प्रथम स्पर्धकास १० हजार ,द्वितीय क्रमांकाशी ८ हजार आणि तृतीय क्रमांकाशी ५ हजार रुपये ,स्मृतिचिन्ह असे पारितोषिक देण्यात येणार आहे ,अशी माहिती हाजी गुलाम महंमद आझम एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष झुबेर शेख यांनी पत्रकाद्वारे दिली .
सर्व धर्मीय स्पर्धकांना सहभागी होता येईल . १० डिसेंबर पर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. . नाव नोंदणीसाठी संपर्क :०२०२६४५२२८८
इ मेल –hgmaetrust@gmail.com