पुणे : भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ (आय.एम.ई.डी.)च्या वतीने आंतरमहाविद्यालयीन ‘सी-गुगली स्पर्धा २०१८’ चे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन क्विंस्टन पिमेन्टा (मुख्य तांत्रिक अधिकारी, क्वार्क प्रा. लि.) यांच्या हस्ते झाले.
उद्घाटनप्रसंगी डॉ. सचिन वेर्णेकर (भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता आणि आयएमईडीचे संचालक) उपस्थित होते. ही स्पर्धा आय.एम.ई.डी कॅम्पसमध्ये २१ आणि २२ सप्टेंबर रोजी झाली.
या स्पर्धेमध्ये पुण्यातील विविध महाविद्यालयातून एम.सी.ए विभागाचे पदवीचे शिक्षण घेणारे व पदव्युत्तर विद्यार्थी सहभागी झाले होते.
‘माहिती तंत्रज्ञान’ विषयावर आधारित या स्पर्धेचे संयोजन प्रा. डॉ. अजित मोरे, प्रा.सत्यवान हेंबाडे, प्रा.डॉ. नीलेश महाजन, भारती ऐलीकर यांनी केले होते.
पदवीचे शिक्षण घेणारे व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना तांत्रिक कौशल्य वाढ आणि क्षमता वाढीसाठी उपयोग व्हावा या प्रमुख हेतूने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.