शास्त्र आणि शस्त्राचा अभ्यास करून जेते व्हा !
कर्नल जोगळेकर यांचे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना आवाहन
सेनानी ने उलगडली सैनिकांची पराक्रम गाथा !
पुणे : ‘अर्जुन निर्माण करायचे असतील तर गुरु देखील द्रोणाचार्यांसारखे असावे’, असे प्रतिपादन पूर्व सेनानी कर्नल अरविंद जोगळेकर यांनी केले.
भारती विद्यापीठ अभिमत विश्व विद्यालयाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे ‘आर्ट सर्कल’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे वक्ते या नात्याने ते बोलत होते.
‘मी एक सैनिक’ हा व्याख्यानाचा विषय होता. महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रा . आनंद भालेराव यांनी जोगळेकर यांचे स्वागत आणि सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन प्रा. अनघा सोमण यांनी केले .
जोगळेकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, ‘सैन्यात इन्स्ट्रक्टर हा एक मानाचा तसेच जवाबदारीचा हुद्दा समजला जातो . कारण याच शिक्षकांच्या हाता खालून जे विद्यार्थी बाहेर पडतात त्यावरच सैन्याची आक्रमकता , नैपुण्य आणि नेतृत्व करण्याची क्षमता अवलंबून असते.’